ऐतिहासिक माहिती

इतिहास आणि बदल

घोटावडे हा परिसर परंपरागतरीत्या शेतीवर अवलंबून होता. घोटावडे गाव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात तांदळाची मुख्य बाजार पेठ म्हणून त्याकाळी ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे काळात शाहिस्तेखान पुण्यात आला तेव्हा घोटावडे गावात लुटमारी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळातील वीर मराठे मरण पावले त्यावेळेस त्यांची विरंगळी म्हणून बसविण्यात आली होती. ब्रिटीश काळात क्रांती सिंह नाना पाटील बाजार पेठेत वसुली करत होते त्या घटनेत वल्लभ शेठ गुजराथी गोळीबारात मरण पावले होते ,त्याकाळात गावामध्ये एक गाव एक गणपती उत्सव साजरा केला जात असे. आषाढ महिन्यात भात लागवडीच्या पूर्वी साथ म्हणजे ( धार्मिक पूजा ) हि परंपरा अजूनही गावात चालू आहे.

ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन

स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत कामांमधून त्यांचा कारकीर्द सुरू झाली.

लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे

घोटावडे ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, घोटावडे ची लोकसंख्या 5483 आहे.

शिक्षण आणि संस्था

गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत एकून ८ जि.प. शाळा आहेत ३ बालवाडी ६ अंगणवाडी असून स्थानिक ,सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क

स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात.

धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव

चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती तसेच ग्रामदैवत श्री. रोकडेश्वर मंदिर घोटावडे येथे उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दरवर्षी येतात. आरोग्य उपकेंद्र व दवाखाने घोटावडे गावात उपलब्ध आहेत. गावात पथवाटा व पाणी सुविधा वाढल्याने लहान मोठे उद्योग व सेवाक्षेत्रात सुधारणा दिसते.